चीन सोबत अविष्कार की बहिष्कार

भारत - चीन सीमा विवाद 

भारत-चीन चकमकीच्या बातम्या येण्यापूर्वी रेंचो म्हणजेच सोनम वांगचुक यांचा "चिनी मालाचा बहिष्कार करा" या आशयाचा एक व्हिडिओ व्हायरल होत होता यातून काही प्रश्न उपस्थित होतात....

खरच सर्व चिनी मालावर बहिष्कार करणे शक्य आहे का.?

 यातून चीनला धडा शिकवता येईल का.?


2018 -19 च्या आकडेवारीनुसार भारताची चीनमधे निर्यात ही ( 16.7 बिलीयन डॉलर ) एवढी होती तर चीनची भारतातील निर्यात ही (70.3 बिलियन डॉलर) म्हणजे जवळजवळ 54 बिलियन डॉलर चा फरक हा फरक आपण कसा भरून काढणार आहोत

बरं ही भारतातील 70 बिलियन डॉलर ची निर्यात चीनच्या एकूण निर्यातीच्या फक्त 2 टक्के आहे म्हणजे त्यांची 98 टक्के निर्यात इतर देशांमध्ये आहे.त्यामुळे या बहिष्काराचा फारसा फरक चीनला पडणार नाही...

भारतातील इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील 60 टक्के आयात ही चीनवर अवलंबून आहे.

Vivo, oppo, realme, xiaomi या चार चायनीज ब्रँड ने भारताच्या एकूण स्मार्टफोन बाजारातील 60 टक्के व्यापार काबीज केला आहे तर खेळण्यांचा 90 टक्के व्यापार हा चीनवर अवलंबून आहे.

"Gateway House" च्या एका रिपोर्ट नुसार(सर्व आकडेवारी मिलियन डॉलरमध्ये)
 चीनच्या एकट्या अलीबाबा ग्रुपने
Zomato मध्ये ($200million)
Paytm ($400million)
Snapdeal ($ 700 million)
अशी मोठी गुंतवणूक केली आहे.
चीन सोबत अविष्कार की बहिष्कार


तसेच चीनच्या इतर व्यापारी ग्रुपने भारतातील 
Ola मध्ये  ($500 Million)
Swiggy($500 M)
Flipkart ($300 M)
Hike Messenger($ 150 M)
dream11 ($150 M)
byju's मध्ये ($ 50 M)

यातील अनेक कंपन्यांची मालकी चीनकडे नसली तरीही त्यातील बहुतांश वाटा चिनच्या भांडवलदारांकडे आहे. यामध्ये बर्‍याच कंपन्या भारतीयांच्या मालकीच्या आहेत मग अशा कंपन्यांचा बहिष्कार आपण कसा करणार आहोत...?

भारत फक्त इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी नव्हे तर औषधांसाठी लागणाऱ्या कच्चा मालासाठीही चीनवर अवलंबून आहे. सध्याच्या कोरोनाच्या संकटात मोठ्या प्रमाणावर वापरले जाणाऱ्या औषधांपैकी एक हायड्रोसि क्लोरोक्वीन (HCQ) या औषधासाठी लागणारा Active Pharmaceutical Ingredients (API) म्हणजेच कच्चामाल हा चीनकडेच उपलब्ध आहे त्यामुळे अशा काळात चिनी मालावरील बहिष्कार आपल्याला परवडणारा आहे का...?

सध्याच्या भारत-चीन तणावावर दोन्ही देशांमधील योग्य संवादानेच तोडगा निघू शकतो. "युद्ध" हा या तणावावर उपाय असूच शकत नाही मग ते व्यापारी युद्ध असो किंवा सीमेवरील युद्ध...

विचार 

अविष्कार ( Innovation ) VS बहिष्कार (Boycott)

अविष्कारात बुध्दीचा व मेहनतीचा कस लागतो .हे एकटा माणूसही करू शकतो आणि ते sustainable पण असते . तर बहिष्कार हा फक्त समुहानेच होऊ शकतो आणि त्याच्या परिणामांची शाश्वती नसते. So Choice is Yours 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post