4 Jun 2020 Current Affairs in Marathi (Chalu Ghadamodi)

देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरेंचा समावेश 


देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमधील नेते आणि राष्ट्रीय नेत्यांची लोकप्रियता जाणून घेण्यासाठी आयएएनएस आणि सी व्होटर्स या संस्थेने संयुक्तरित्या केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल समोर आला आहे.

तर या अहवालातील आकडेवारीनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता 76.52 टक्के असल्याचे म्हटले आहे. इतकंच नाही तर उद्धव ठाकरे यांचा समावेश देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये झाला आहे.

आयएएनएस आणि सी व्होटर्सने देशभारातील वेगवेगळ्या राज्यांमधील जनतेकडून राष्ट्रीय तसेच राज्य स्तरावरील नेत्यांच्या लोकप्रियतेबद्दल जाणून घेण्यासाठी एक सर्वेक्षण केलं.

तसेच यामध्ये राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर बहुतांशी मतदारांनी शिक्कामोर्तब केलं.
या सर्वेक्षणानुसार बिजू जनता दलाचे (बीजेडी) अध्यक्ष आणि ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. मिळवा.

एक देश एक बाजार धोरणाला मंजुरी 


शेतीमाल देशभर कुठेही विकण्याची मुभा देणाऱ्या ‘एक देश एक बाजार’ या धोरणाला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

तर या संदर्भातील अध्यादेश काढला जाणार असून आत्मनिर्भर भारत योजनेचा तपशील जाहीर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या धोरणाचा उल्लेख केला होता.

तसेच शेतकऱ्यांना आता स्थानिक कृषी बाजारावर अवलंबून राहावे लागणार नाही. त्यामुळे शेतीमालाला जिथे अधिक दर मिळेल तिथे विकण्याचा अधिकार शेतकऱ्यांना मिळेल, असे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

आत्ता शेतकऱ्यांना कृषी बाजारात शेतीमाल विकावा लागतो. शिवाय, आंतरराज्य विक्रीलाही परवानगी नाही. पण नव्या अध्यादेशामुळे शेतकऱ्यांना शेतीमाल कुठेही व कुणालाही विकता येईल. या संदर्भात नवा कायदा केला जाईल. मात्र, विद्यमान कृषी बाजार समित्या अस्तित्वात राहणार आहेत.

तर या नव्या धोरणामुळे फक्त अडत्यांना शेतीमालाची विक्री करण्याचे बंधन शेतकऱ्यांवर राहणार नाही. या बाजारांबाहेर अन्नप्रक्रिया कंपन्यांनाही शेतकऱ्यांना शेतीमाल विकता येईल.

शेतीमालाच्या विक्रीसंदर्भात हंगामापूर्वी कंपन्यांशी करार करता येईल. या करारातील दरांच्या आधारावर शेतीमालाची विक्री केली जाऊ शकेल. या विक्रीवर कोणत्याही प्रकाराचा कर व शुल्क आकारणी केली जाणार नाही.

प्रक्रिया उद्योग कंपनी, निर्यातदार, मोठे घाऊक व्यापारी, ई-व्यापार करणाऱ्या कंपन्या अशा शेतीमाल विक्रीशी निगडित विविध क्षेत्रांशी शेतकरी विक्री करार करू शकतील.

6 जूनला अस्मानी संकटाचा नासाने दिला इशारा 


पृथ्वीसाठी धोकादायक ठरु शकणारी एकी एक लघुग्रह (अ‍ॅस्टेरॉईड) पृथ्वीजवळून जाणार असल्याचा इशारा अमेरिकेमधील अंतराळ संशोधन संस्था असणाऱ्या नासाने दिला आहे.

जून महिन्यामध्ये हा लघुग्रह पृथ्वीजवळून जाणार असून यासंदर्भातील माहिती नासानेच आपल्या वेबसाईटवर दिली आहे.
तर या लघुग्रहाचे नाव ‘163348 (2002 एनएच फोर)’ असं असल्याचे नासाच्या वेबसाईटवर म्हटलं आहे.

सहा जून रोजी हा लघूग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार असून त्याचा व्यास 250 ते 570 मीटर इतका असल्याचं नासानं म्हटलं आहे.

‘163348 (2002 एनएच फोर)’ हा लघुग्रह पृथ्वीपासून 5.1 दशलक्ष किमी दूरून जाणारा असल्याचा अंदाज नासाने व्यक्त केला आहे.

चिनी विमान कंपन्यांना अमेरिकेत बंदी 


चिनी विमान कंपन्यांवर निर्बंध घालण्याची भूमिका अमेरिकेने घेतली आहे. येत्या 16 जूनपासून अमेरिकेतून उड्डाण करण्यास किंवा अमेरिकेत येण्यास चार चिनी कंपन्यांच्या प्रवासी विमानांवर बंदी लागू करण्यात येईल, असे अमेरिकेने म्हटले आहे.

करोनाच्या प्रादुर्भावानंतर युनायटेड एअरलाईन्स आणि डेल्टा एअरलाईन्सवर चीनने घातलेले प्रवास निर्बंध या आठवडय़ात मागे घेण्यात आलेले नाहीत. त्यामुळे चीनने करारभंग केल्याचा आरोप करत ट्रम्प प्रशासनाने हा निर्णय घेतला. अमेरिकेच्या या निर्णयाचा एअर चायना, चायना इस्टर्न एअरलाईन्ससह चार विमान कंपन्यांना फटका बसणार आहे.

G-7 समिट तहकूब;  G 10 किंवा G 11 पर्यंत वाढवता येऊ शकते


मुद्दा


 G-7 हा फ्रान्स, कॅनडा, जर्मनी, जपान, यूएसए आणि यूके अशा सात देशांचा गट आहे.  गटाचे निश्चित मुख्यालय किंवा औपचारिक घटना नाही.  शिखर परिषदेत घेतलेले निर्णय बंधनकारक असतात.  ऑस्ट्रेलिया, रशिया, भारत आणि दक्षिण कोरिया या तीन राष्ट्रांचा समावेश करण्यासाठी अध्यक्ष ट्रम्प यांना G -7 गटाचा विस्तार करायचा आहे.

G-7


 G 7 ही 1975 मध्ये स्थापन केलेली एक आंतर-सरकारी संस्था आहे.  जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांनी जागतिक समस्येवर चर्चा करण्यासाठी अनौपचारिक मंच म्हणून याची स्थापना केली.  1976 मध्ये कॅनडा G 7 मध्ये सामील झाला आणि युरोपियन संघाने 1977 पासून G 7 च्या बैठकीस भाग घ्यायला सुरवात केली.

 1997 मध्ये, रशिया G 7 मध्ये सामील झाला.  सुरुवातीला G 7 ला G 8 म्हणतात. 2014 मध्ये युक्रेनच्या क्रिमिया प्रदेशास त्याच्या प्रदेशात समाविष्ट केल्यामुळे रशियाला हद्दपार करण्यात आले.

G-7 ते G- 20 


G -20 हा एक मोठा गट आहे आणि त्यात जी -7 मधील सर्व सदस्यांचा समावेश आहे.  भारत G -20 चा सदस्य आहे.  G -20 ची स्थापना  1999 मध्ये करण्यात आली होती. जागतिक आर्थिक चिंतेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी अधिक देश आणण्याच्या प्रतिक्रियेत.  G -20 मध्ये 80% जागतिक अर्थव्यवस्था आहे.

दिनविशेष - 4 जून


4 जून – घटना


1674 : राज्याभिषेकापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्णतुला झाली. ब्रिटिश वकिलातीच्या मते त्यांचे वजन सुमारे 73 किलो भरले.
1876 : ट्रान्सकाँटिनेन्टल एक्स्प्रेस रेल्वे अमेरिकेच्या दोन तीरांना जोडणारी ही.

4 जून – जन्म


1738 : इंग्लंडचा राजा जॉर्ज (तिसरा) यांचा जन्म. (मृत्यू: 29 जानेवारी 1820) 
1904 : भारतीय प्रकाशक, पर्यावरणवादी भगत पुराण सिंह यांचा जन्म. (मृत्यू: 5 ऑगस्ट 1992 ) 
1910 : होव्हर्क्राफ्ट चे शोधक ख्रिस्तोफर कॉकेरेल्म यांचा जन्म.

4 जून – मृत्यू


1947 : बौद्ध धर्माचे अभ्यासक पंडित धर्मानंद कोसंबी यांचे निधन. (जन्म: 9 ऑक्टोबर 1876) 
1962 : अमेरिकन निसर्गतज्ज्ञ चार्ल्स विल्यम बीब यांचे निधन.
1998 : इतिहासतज्ज्ञ डॉ.अश्विन दासगुप्ता यांचे निधन.


Must Read (नक्की वाचा)
चालू घडामोडी 3 जून  2020

credit by:- स्त्रोत -PIB,The Hindu ,Times of India,Indian Express,BCC मराठी,लोकसत्ता,महाराष्ट्र टाइम्स

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post