चालू घडामोडी 25 जून
आयजी-जी सीएलआयए अँटिबॉडी या चाचणीतून कळणार करोना होऊन गेला का :
आता करोना होऊन गेला का? याची खातरजमा करण्यासाठी एका चाचणीतून करता येणार आहे.
“आयजी-जी सीएलआयए अँटिबॉडी चाचण्यांच्या माध्यमातून हे माहिती करून घेता येणार आहे.
तसेच आयजी-जी अँटिबॉडीच्या निदानासाठी केल्या जाणाऱ्या प्रयोगशाळा आधारित रक्त चाचणी साहित्याचा पुरवठा सुरू केल्याचे अबॉटने आज जाहीर केले आहे.
तर या चाचणीची 1 दशलक्ष किट्स भारतात पुरवण्याची क्षमता असल्याचा विश्वास ऑबॉटनं व्यक्त केला आहे.
देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 4 लाख 56 हजारांवर गेला:
देशातील कोरोनाबाधितांचा आकडा बुधवारी 4 लाख 56 हजारांवर गेला असताना, त्यात सर्वाधिक म्हणजे 1 लाख 42 हजार 900 रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहेत.
त्यातही मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर, अकोला, सोलापूर येथील परिस्थिती काळजी वाटावी, अशी आहे.
महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 73 हजार 792 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण 51.64 टक्के आहे.
देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 56.71 टक्के आहे.
भारताच्या तीनही सेनादलातील सैनिकांचे पथक मॉस्कोतील संचलनात सहभागी:
रशियाची राजधानी असलेल्या मॉस्कोत दुसऱ्या महायुद्धातील विजय दिनाच्या पंचाहत्तरीनिमित्त आयोजित कार्यकमातील संचलनास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते.
भारताच्या सैन्य दलाची तुकडी या संचलनात सहभागी असल्याचा अभिमान वाटतो, असे राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितले.
ते तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर असून रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने त्यांना मॉस्कोतील लाल चौकात आयोजित संचलनासाठी निमंत्रित केले होते.
भारताच्या तीनही सेनादलातील सैनिकांचे पथक संचलनात सहभागी आहे, याचा अभिमानाच आहे असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
Follow on Instagram
credit by:- स्त्रोत -PIB,The Hindu ,Times of India,Indian Express,BCC मराठी,लोकसत्ता,महाराष्ट्र टाइम्स
Post a comment
please do not enter any spam link in the comment box