13 Jun 2020 Current affairs in marathi(chalu ghadamodi )
आयसीसीने केला काही नियमांमध्ये बदल

चालू घडामोडी 13 जून 

करोनाबाधितांच्या यादीत चौथ्या स्थानावर पोहोचला भारत:


गेल्या २४ तासांमधील करोना रुग्णांची संख्या लक्षात घेता भारताने युनायटेड किंगडमला मागे टाकत सर्वाधिक करोनाबाधितांच्या यादीत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.

वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार भारतात करोना रुग्णांची संख्या तीन लाखांच्या घरात पोहचली आहे.

सध्या भारतातील करोनाबाधितांची संख्या दोन लाख 98 हजार 205 इतकी झाली आहे.

गेल्या आठवड्यात स्पेनला मागे टाकत भारत पाचव्या स्थानावर पोहचला होता.

अमेरिकेत आतापर्यंत 20 लाख 89 हजार 701 जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे.

दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ब्राझिलमध्ये 8 लाखांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण आहेत. तर तिसऱ्या स्थानावर असलेल्या रशियामध्ये पाच लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत.

आयसीसीने केला काही नियमांमध्ये बदल:


क्रिकेटचे सामने सुरु करण्यासाठीही आयसीसीने काही नियमांमध्ये बदल केला आहे.

ज्यात गोलंदाजांना चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळेचा वापर न करणं, स्थानिक पंच आणि सामनाधिकाऱ्यांना प्रथम प्राधान्य, बदली खेळाडू, DRS च्या संख्येत असे अनेक नियम आखून देण्यात आले आहेत.

याचसोबत ऑस्ट्रेलियात आयोजित करण्यात येत असलेल्या बिग बॅश लिग स्पर्धेच्या आयोजकांनीही नियमांमध्ये बदल केला आहे.

यामधला सर्वात महत्वाचा बदल म्हणजे बिग बॅश लिगमध्ये आता वाईड बॉलवरही फ्री हीट दिली जाणार आहे.

याआधी आयसीसीच्या नियमानुसार फक्त नो-बॉलवर फलंदाजाला फ्री-हीट मिळायची.

याव्यतिरीक्त पहिल्या 10 षटकांत सर्वाधिक धावा करणाऱ्या संघाला बोनस गूण, परिस्थितीनुसार 10 षटकानंतर पर्यायी खेळाडूला मैदानात उतरवणं असे काही नवीन नियम बिग बॅश लिगमध्ये लागू करण्यात येणार आहेत.

आयटी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या भारतीयांना मोठया प्रमाणात फटका बसू शकतो:


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प H-1B सह रोजगार देणारे काही व्हिसा स्थगित करण्याचा विचार करत आहेत. याचा भारतीयांना मोठया प्रमाणात फटका बसू शकतो.

आयटी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या भारतीय तरुण-तरुणींकडून मोठया प्रमाणात H-1B व्हिसासाठी अर्ज केला जातो.

अमेरिकेतील स्थानिकांना जास्तीत जास्त रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी डोनाल्ड ट्रम्प H-1B सह काही व्हिसा स्थगित करण्याचा विचार करत आहेत.

एक ऑक्टोंबरपासून सुरु होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात ट्रम्प प्रशासनाकडून ही स्थगिती लागू केली जाऊ शकते. कारण याच काळात नवीन व्हिसा जारी केले जातात.

अमेरिकेत आर्थिक वर्ष ऑक्टोंबरपासून सुरु होते.

अमेरिकन टेक्नोलॉजी कंपन्या दरवर्षी H-1B व्हिसाच्या आधारे हजारो भारतीय आणि चिनी तरुणांना नोकऱ्या देतात.

देशातील नव्या शैक्षणिक धोरणानुसार क्रीडा विषयाचा समावेश:

देशातील नव्या शैक्षणिक धोरणानुसार क्रीडा विषय हा आता नियमित अभ्यासक्रमाचा भाग असेल, असे केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक शिक्षणावर आयोजित करण्यात आलेल्या एका वेबसंवादामध्ये रिजिजू यांनी त्यांचे मत मांडले. खेळाकडे पर्यायी विषय म्हणून पाहणे चुकीचे आहे.

देशातील नव्या शैक्षणिक धोरणानुसार आता खेळ हा विषयसुद्धा विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग असेल. असे ४८ वर्षीय रिजिजू म्हणाले.

देशाच्या नव्या शैक्षणिक धोरणाची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी यासंबंधी जवळपास अंतिम निर्णय झाला आहे. 

क्रीडा मंत्रिमंडळातील सर्व सभासदांनी खेळाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याविषयी पुढाकार घेतल्याने हे शक्य झाले.असेही रिजिजू यांनी सांगितले.

दिनविशेष 13 जून 

13 जून – जन्म

1822: जर्मन रसायनशास्त्रज्ञ कार्ल श्मिट यांचा जन्म. (मृत्यू: 27 फेब्रुवारी 1894)
 1831 : प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनतो, असा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक गणितज्ञ जेम्सक्लार्क मॅक्सवेल यांचा

13 जून – मृत्यू

1967 : भारतीय शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचे निधन. (जन्म: 2 ऑक्टोबर 1811)
1969 : विनोदी लेखक, नाटकाकर, कवी, पत्रकार, शिक्षणशास्त्रज्ञ, टीकाकार, प्रभावी वक्ता, राजकारणी केशवकुमार उर्फ प्रल्हाद केशव.

13 जून- घटना

1881: यू. एस. एस. जीनेट आर्क्टिक समुद्रात नष्ट.
1886 : कॅनडातील व्हॅनकूवर शहर आगीत बेचिराख.
1934: व्हेनिसमध्ये  ऑडॉल्फ हिटलर आणि बेनिटो मुसोलिनी यांची भेट.
1956: पहिली युरोपियन चॅम्पियन

Must Read (नक्की वाचा)
चालू घडामोडी 12 जून 2020

Follow on Instagram

join telegram channel

credit by:- स्त्रोत -PIB,The Hindu ,Times of India,Indian Express,BCC मराठी,लोकसत्ता,महाराष्ट्र टाइम्स

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post