चालू घडामोडी 11 जून 


पहिल्याच दिवशी तिजोरीत ‘इतकं’ दान- तिरुपती मंदिर


लॉकडाउननंतर सोमवारी(दि.8) पहिल्यांदाच तिरुमला तिरुपती देवस्थान उघडण्यात आलं. मंदिर सोमवारपासून तीन दिवस ‘ट्रायल’ म्हणून उघडण्यात आलं होतं.

11 जूनला म्हणजे आजपासून मंदिर भक्तांसाठी उघडण्यात येणार आहे.

भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थान असलेले तिरुमला तिरुपती देवस्थान करोना व्हायरसच्या संकटामुळे 20 मार्चपासून बंद होते. सोमवारी हे मंदिर पहिल्यांदा उघडले आणि पहिल्याच दिवशी भाविकांनी तब्बल 25 लाख 70 हजार रुपये दान केले.

पहिले दोन दिवस फक्त टीटीडी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांसाठी मंदिर उघडण्यात आले होते. तर, तिसऱ्या दिवशी मंदिर स्थानिकांसाठी उघडण्यात आले होते.

पहिले दोन दिवस मंदिरात जवळपास 12 हजार भक्तांनी दर्शन घेतले. ते सर्व टीटीडी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील लोकं होते.


मोदी सरकारनं शेतकऱ्यांसाठी घेतला ऐतिहासिक निर्णय; रयत क्रांती संघटना करणार स्वागत- सदाभाऊ खोत


पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतलेत. शेतमाल आणि जीवनावश्यक वस्तू कायद्यासंदर्भातील मोदी सरकारचे निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विळख्यातून शेतकऱ्यांची त्यांनी सोडवणूक केली आहे. शेतकऱ्याला सर्वच बाजारपेठा खुल्या केल्या आहेत. शेतकरी स्वतः आपल्या मालाचे मार्केटिंग आता करू शकतो, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले पाहिजेत.

त्यासाठी रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांना येत्या ११ जूनला सकाळी ११ वाजता विजय दिवस साजरा करण्याचे आवाहन यावेळी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी झुम या ऑनलाइन वेबिनारच्या माध्यमातून पत्रकारांशी बोलताना केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाने अत्यावश्यक वस्तू कायद्यात सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन इंग्रजांनी केलेला 75 वर्षांचा काळा कायदा रद्द केला. हा एक ऐतिहासिक निर्णय आहे.

सरकारला वाटेल तेव्हा कोणाताही शेतमाल अत्यावश्यक सूचित टाकण्याचा पूर्वीचा कायदा शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा होता. नव्या कायद्याने कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी अत्यावश्यक वस्तू कायद्यात सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. 

ग्रामीण भारताला ऐतिहासिक प्रोत्साहन देणाऱ्या व कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने हे एक दूरदृष्टीचे टाकलेले ऐतिहासिक पाऊल आहे.

त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याचे मुक्तिदाता ठरणार आहेत. अत्यावश्यक वस्तू कायद्यात सुधारणा केल्यामुळे तृणधान्ये, डाळी, तेलबिया, खाद्यतेल, कांदा आणि बटाटा यांसारखी उत्पादने अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून काढून टाकण्यात आली आहेत.

यामुळे खासगी गुंतवणूकदारांना, आता नियमनांची आणि सरकारी हस्तक्षेपाची अवाजवी भीती असणार नाही.
केंद्र सरकारच्या निर्णयामुळे शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही मदत होईल आणि वस्तूंच्या किमती स्थिर राहतील. तसेच साठवणूक सुविधांच्या अभावामुळे कृषीमालाचे होणारे नुकसान देखील कमी करता येईल.

केंद्र सरकारच्या नव्या ऐतिहासिक निर्णयामुळे शेतकरी आणि व्यापारी दोघांनाही कृषी उत्पादने खरेदी आणि विक्री करण्यात आवड-निवडीचे स्वातंत्र्य असेल. त्याशिवाय यामुळे नोंदणीकृत एपीएमसीच्या बाहेर, आंतरराज्य आणि राज्यांतर्गत व्यापार करण्याची मुभा मिळणार आहे.

पर्यटकांसाठी २५ जूनपासून खुला होणार आयफेल टॉवर


आयफेल टॉवर पर्यटकांसाठी २५ जूनपासून खुला होणार आहे. पॅरीसमध्ये आयफेल टॉवर आहे. करोनाच्या संकटामुळे आयफेल टॉवर पर्यटकांसाठी गेल्या तीन महिन्यांपासून बंद ठेवण्यात आला आहे. आता आयफेल टॉवर पर्यटकांसाठी २५ जून पासून खुला होणार आहे AFP ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. एएनआयने ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

आयफेल टॉवरच्या पायऱ्या खुल्या करण्यात येतील. एलिव्हेटर सुरु करण्यात येणार नाही. पर्यटकांनी आयफेल टॉवर पाहण्यासाठी येताना सुरक्षित अंतर ठेवणं हे सक्तीचं असणार आहे असं आयफेल टॉवरच्या वेबसाइटवर नमूद करण्यात आलं आहे. आयफेल टॉवरची सर्वात उंच बाजू ही बंदच राहणार आहे.

आयफेल टॉवरची निर्मिती १८८७ ते १८८९ या दोन वर्षांमध्ये करण्यात आली. पॅरीसमधल्या सर्वाधिक उंच टॉवरमध्ये आयफेल टॉवरची गणना केली जाते. या टॉवरची उंची ३२४ मीटर आहेत. एखाद्या ८१ मजली इमारतीएवढी या टॉवरची उंची आहे. या टॉवरच्या तीन लेव्हल आहेत. या तीन लेव्हल्सला पर्यटक भेट देऊ शकतात. या टॉवरच्या पहिल्या आणि दुसऱ्या लेव्हलवर रेस्तराँ आहेत. २७६ मीटरवर म्हणजेच ९०६ फुटांवर या टॉवरची तिसरी लेव्हल आहे. या ठिकाणाहून पर्यटकांना निरीक्षण करता येतं. आयफेल टॉवरला दरवर्षी साधारण ७ लाख पर्यटक भेट देतात.

अभिमानास्पद! भारतीय हवामान विभागाचं अचूक अंदाजाबद्दल जागतिक हवामान संघटनेकडून कौतुकपाऊस आणि इतर नैसर्गिक संकटाबद्दल भारतीय हवामान विभाग अंदाज व्यक्त करतो. त्याचबरोबर धोकादायक संकट असेल, तर आधीच सूचना करून प्रशासनाला सावध करण्याच काम करतो. मात्र, पावसाच्या अंदाजावरून अनेक वेळा हवामान विभागावर विनोदही केले जातात. मात्र, अम्फान चक्रीवादळाबद्दल भारतीय हवामान विभागानं व्यक्त केलेल्या अंदाजानं जागतिक हवामान संघटनाही प्रभावित झाली आहे. याबद्दल भारतीय हवामान विभागाचं संघटनेनं कौतुक केलं आहे.

बंगालच्या खाडीत कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अम्फान चक्रीवादळ निर्माण झालं होतं. या चक्रीवादळाचा पश्चिम बंगाल आणि ओडिशा या दोन राज्यांना फटका बसला. या चक्रीवादळाची तीव्रता आणि त्यांच्याविषयी इतर बाबींचे निरीक्षण नोंदवत भारतीय हवामान विभागानं आधीच दोन्ही राज्यांना सावध राहण्याचा इशारा दिला होता. हे चक्रीवादळ २० मे रोजी पश्चिम बंगाल आणि ओडिशात धडकले होते.

भारतीय हवामान विभागानं व्यक्त केलेल्या अचूक अंदाजामुळे मालमत्तेचं नुकसान झालं असलं, तरी मोठ्या प्रमाणात जीवित हानी टळली. कारण दोन्ही राज्यांनी चक्रीवादळ येण्या आधीच फटका बसणाऱ्या भागातून लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं होतं.

जी म्हणजे जिनिअस - लॉकडानमध्येही पारलेची जबरदस्त कमाई, मोडला ८२ वर्षांचा रेकॉर्डलॉकडाउनमध्ये एकीकडे अनेक कंपन्या तोट्यात असताना पारले जी बिस्किटाने मात्र आतापर्यंतच्या सर्वाधिक विक्रीची नोंद केली आहे. पाच रुपयांपासून मिळणारा पारले जी बिस्कीटाचा पुडा अनेक स्थलांतरित मजुरांसाठी दोन वेळचं अन्न ठरलं होतं. कित्येक किलोमीटर चालत निघालेल्या मजुरांना पोटाला आसरा म्हणून स्वस्तात मिळणारे पारले जी बिस्कीटाचे पुडे विकत घेतले होते.

याशिवाय लॉकडाउनमुळे घरात अडकल्याने भूक लागल्यावर घरात काहीतरी असावं म्हणूनही अनेकांनी पारले जी बिस्किट मोठ्या प्रमाणात विकत घेतली होती. तर काही ठिकाणी गरजूंना वाटप करण्यासाठी काही समाजसेवी संस्था तसंच इतरांनाही पारले जी बिस्किटाचा पर्यायच निवडला होता. याचा मोठा फायदा पारले जी कंपनीला झाला आहे.

१९३८ पासून घराघरात पोहोचलेल्या पारले जी बिस्किटाने लॉकडाउनमध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीची नोंद केली आहे. पारले जी बिस्किटाची निर्मिती करणाऱ्या पारले प्रोडक्ट्सने नेमकी किती विक्री झाली आहे याची सविस्तर आकडेवारी देण्यास नकार दिला आहे. पण गेल्या आठ दशकातील आकडेवारी पाहता मार्च, एप्रिल आणि मे हे सर्वोत्तम महिने राहिले असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

संजिता चानूवरील आरोप अखेर मागे घेतले


भारताची वेटलिफ्टर के. संजिता चानूवरील उत्तेजक द्रव्य सेवनप्रकरणी करण्यात आलेले आरोप अखेर आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाने (आयडब्ल्यूएफ) मागे घेतले आहेत.

चानूचे जे चाचणीचे नमुने घेण्यात आले होते, त्यात विसंगती आढळल्याने जागतिक उत्तेजकविरोधी संस्थेकडून (वाडा) चानूवरील आरोप मागे घेण्यास ‘आयडब्ल्यूएफ’ला सांगण्यात आले.

‘‘उत्तेजक सेवन प्रकरणाच्या आरोपातून अधिकृतरीत्या माझी सुटका झाली आहे याचा आनंद आहे. मात्र त्यामुळे टोक्यो ऑलिम्पिकसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेला पात्र ठरण्यासाठी असलेल्या स्पर्धाना मी मुकले.

या आरोपांच्या निमित्ताने मला जो मानसिक त्रास झाला आहे त्याची जबाबदारी कोण घेणार,’’ असे मणिपूरच्या चानूने म्हटले आहे.

ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक वामनराव तेलंग यांचे निधन


ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक वामनराव तेलंग यांचे निधन. बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

उपचारादरम्यान हृदयविकाराचा जोरदार झटका आल्याने त्यांचे निधन झाले. वामनराव तेलंग हे दै. तरुण भारतचे माजी संपादक आणि विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष होते.

22 मार्च रोजी वामनराव तेलंग यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता. तसेच एक गौरविकाही निघणार होती. परंतु, देशात वाढलेल्या कोरोना विषाणुमुळे तो कार्यक्रम रद्द करावा लागला होता.

दऱ्याखोऱ्यांत, घनदाट जंगलात महावितरणचे काम


निसर्ग’ चक्रीवादळाच्या तडाख्याने जावळी खोऱ्यातील घनदाट जंगल व दऱ्याखोऱ्यांत जमीनदोस्त झालेली वीजयंत्रणा उभारण्यासाठी अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीत महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी चार दिवस यशस्वी झुंज देत सातारा जिल्ह्यातील प्रतापगडसह अतिदुर्गम 16 गावे (ता. महाबळेश्वर) प्रकाशमान केली आहेत.

महाबळेश्वर येथील महावितरणच्या वेण्णालेक उपकेंद्रातून प्रतापगड उच्चदाब 22 केव्ही क्षमतेच्या वीजवाहिनीद्वारे सह्याद्री डोंगररांगेत असलेल्या अतिदुर्गम जावळी खोऱ्यातील प्रतापगड, मेटतळे, वाडा कुंभरोशी, शिरवली, कासरूड, हतलोट, बिरवाडी, डिरमणी, जावळी, दुधोशी, फरोशी, पारसोंड, प्रतापगड आदी 16 गावांतील सुमारे 1250 वीजग्राहकांना वीजपुरवठा केला जातो.

तीन जूनला आलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या तडाख्याने विविध ठिकाणी मोठी झाडे व फांद्या कोसळल्याने या उच्चदाब वीजवाहिनीचे आठ वीजखांब तसेच अडीच किलोमीटर वीजतारा जमीनदोस्त झाल्या.

बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी चक्रीवादळानंतर सातारा जिल्ह्यातील वीजयंत्रणेचा आढावा घेतला. यामध्ये महाबळेश्वर, पाचगणी तसेच प्रतापगडसह 16 गावांचा वीजपुरवठा लवकर सुरु होण्यासाठी प्रयत्न सुरु केले.

कंत्राटदारांचे 15 कर्मचारी व सुमारे 40 ग्रामस्थ यांनी सलग चार दिवस वीजयंत्रणा उभारण्याचे काम केले.

अन्यथा पुनश्च लॉकडाऊन इशारा – मुख्यमंत्र्यांचा 


महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन उठविण्याचे काम सुरू झाले आहे. सर्व व्यवहार पुन्हा नव्याने सुरू करण्याची ही संधी आहे. मात्र, जनतेने संयम दाखवला नाही आणि निष्कारण गर्दी करणे सुरू केले.

तर नाइलाजाने यापेक्षा कठोर लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

सुरक्षित अंतर ठेवून अतिशय सावधपणे काम करावे लागणार आहे.

सकाळी 5 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत मोकळ्या मैदानांमध्ये वावरण्यास मुभा दिली आहे.

जर लोकांनी विनाकारण गर्दी केली आणि त्यातून बाधा वाढत गेली, तर लॉकडाऊन कठोर करावे लागेल. मात्र, महाराष्ट्रातील जनतेवर आपला विश्वास असून, तशी वेळ येणार नाही, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Must Read (नक्की वाचा)credit by:- स्त्रोत -PIB,The Hindu ,Times of India,Indian Express,BCC मराठी,लोकसत्ता,महाराष्ट्र टाइम्स

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post