उत्तर व दक्षिण कोकण
उत्तर कोकण
उत्तर कोकणात पालघर,ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड या जिल्ह्यांचा समावेश होतो.तर कोकण हा दक्षिण कोकणच्या तुलनेत सपाट असून या भागात तांबडी व गाळाची मृदा आढळून येते त्यामुळे या भागात अन्नधान्याचे उत्पादन घेतले जाते.
उत्तर कोकण औद्योगिक दृष्ट्या विकसित असून दळणवळणाच्या सोयी सुविधा जास्त आहेत त्यामुळे दक्षिण कोकणातून व महाराष्ट्राच्या इतर भागातून उत्तर कोकणात स्थलांतर जास्त झालेले आहे याचा परिणाम म्हणूनच महाराष्ट्र स्त्रियांची सर्वात कमी प्रमाण उत्तर कोकणात आढळून येते.
दक्षिण कोकणाच्या तुलनेत उत्तर कोकणात पावसाचे प्रमाण कमी असल्याने या भागात कमी वनस्पती निम्न सदाहरित व पानझडी वने आढळतात.
उत्तर कोकणात दक्षिण कोकणाच्या तुलनेत कमी खनिजे आढळतात.
दक्षिण कोकण
दक्षिण कोकणात रत्नागिरी व सिंधुदुर्ग यांचा समावेश केला जातो.
दक्षिण कोकण खडकाळ व डोंगराळी असल्याने या भागात दळणवळणाच्या सुविधा कमी व उद्योग विकास कमी आहे.
कोकणात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने सदाहरित व निम सदाहरित वने आढळतात व वनांचे प्रमाण ही जास्त आहे .
दक्षिण कोकणातून पुरुषांची स्थलांतर जास्त असल्याने स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे .
महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस दक्षिण कोकणात होतो या भागात लांबी व लॅटेराईट मृदा आढळते.
दक्षिण कोकणात उत्तर कोकणाच्या तुलनेत खनिजे समृद्ध असून या भागात असलेल्या जांभी मृदा लोह व बॉक्साईट साठे तर या भागातील आर्कियन व गोंडवाना भागात कोळसचे साठे आढळतात तर विध्ययन खडकात चुनखडी साठे आढळतात.
Post a comment
please do not enter any spam link in the comment box