राज्यघटना ऐतिहासिक पार्श्वभूमी  Polity Historical background

 राज्यघटना ऐतिहासिक पार्श्वभूमी


इ.स 1600 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून ब्रिटिश लोक भारतात व्यापारी म्हणून आले. राणी एलिझाबेथ पहिली हिने दिलेल्या सनदी नुसार ईस्ट इंडिया कंपनीकडे भारतात व्यापार करण्याचे एक अधिकार होता.

 सुरुवातीस केवळ व्यापारी कामकाज करणाऱ्या कंपनीला इसवीसन 1765 मध्ये बंगाल बिहार व ओरिसा यांचे दिवाणी अधिकार (महसूल व दिवाणी न्यायालयाच्या अधिकार) मिळाला.

बक्सारच्या लढाईत विजयी झाल्यामुळे कंपनीला शहाआलम व मुघल सम्राट कडून दिवाणी अधिकार दिले. यांने कंपनीच्या क्षेत्रीय सत्तेचे सुरुवात झाली.

इसवी सन 1857 च्या उठावामुळे इसवीसन 1858 मध्ये ब्रिटिश राज्य घराने भारतातील शासनाची थेट जबाबदारी घेतली ही राजवट 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य दिले जाईपर्यंत चालू होती.

स्वातंत्र्याबरोबर भारतीयांना राज्यघटनेची आवश्यकता भासू लागली इसवीसन 19 34 मध्ये भारतातील साम्यवादी चळवळीची प्रणेते आणि पुरोगामी लोकशाही विचारवंत M. N रॉय यांनी सुचविल्याप्रमाणे 1946 मध्ये संविधान सभा बनवण्यात आली आणि 26 जानेवारी 1950 पासून राज्यघटना अस्तित्वात आली.

परंतु भारतीय राज्य घटनेच्या आणि राज्यव्यवस्थेच्या विविध वैशिष्ट्यांचे मूळ ब्रिटिश राजवटीत आहे .ब्रिटिश राजवटीतील काही घटनांनी ब्रिटिश कालीन भारतातील सरकारच्या संरचनेच्या आणि कार्याच्या कायदेशीर चौकटीचा पाया घातला. या घटनेचा आपल्या घटनेवर व राज्यव्यवस्था मोठा प्रभाव आहे.

Must Read (नक्की वाचा)
कंपनीची राज्यवाट(1773 - 1858)

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post