महाराष्ट्रचा भूगोल

Mpsc Geography Notes Maharashtracha Bhugol


महाराष्ट्र दख्खनच्या पठाराचा भाग असून यामध्ये महाराष्ट्र पठार तेलंगणा कर्नाटक पठार तमिळनाडू व आंध्रा पठाराचा समावेश होतो 

महाराष्ट्र पठाराची निर्मिती क्रेटेशियास  दशकात रियुनियन ज्वालामुखीच्या क्षेत्रावरील शिलारसाच्या  सिंचनामुळे झाली आहे.

शिलारसाच्या संचयनाने निर्माण झालेल्या दख्खनच्या पठाराच्या त्रिकोणाकृती भागास डेक्कन ट्रॅप म्हटले जाते.

क्रेटेशियस शकात निर्माण झालेल्या डेक्कन ट्रॅपचा विचार केल्या डेक्कन ट्रॅपच्या उत्तरेकडे बेसिक स्वरुपाचा लाव्हा जास्त  प्रमाणात तर दक्षिणेकडे आम्लीय स्वरुपाचा लाव्हा पसरलेला  असल्यामुळे महाराष्ट्राचा पठार हा प्रामुख्याने बेसाल्ट खडकापासून बनलेला आहे . तर दक्षिणेककडील भाग काही प्रमाणात बेसाल्ट तर जास्त  प्रमाणात ग्रेनाईट पासून बनलेला आहे.

वेगजरच्या भूखंड वहन सिद्धता नूसार क्रेटेशियास शकात इंडो - ऑस्ट्रिलियन भागापासून भारताची भूमी विभाजीत होवून उत्तरेकडे वहनास  सुरूवात झाली त्यामुळे रियुनियन ज्वालामुखी क्षेत्रावरून भारतीय भूमी वाहत असताना दक्षिण भागात ज्वालामुखीचे 30-40 वेळा लाव्हारसाच्या संचयनामुळे महाराष्ट्र पठाराची निर्मिती झाली आहे.

प्लेट टेक्टोनिक सिद्धांतानुसार भारत व ऑस्ट्रेलिया इंडो - ऑस्ट्रेलिया भाग असून ही प्लेटच  उत्तरेकडे वहन करत आहे.उत्तरतडे वहन करताना रियुनियन ज्वालामुखी क्षेत्रावरील लाव्हारसाच्या संचयनामुळे दख्यन पठाराची निर्मिती झाली आहे .

महाराष्ट्र निर्मिती

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post