31 may 2020 Current Affairs in Marathi (Chalu Ghadamodi)
जागतिक तंबाखू विरोधी दिन

नासाच्या करोना व्हेंटिलेटर्सचा परवाना पुण्याच्या भारत फोर्जला 


नासाने करोना उपचारांसाठी तयार केलेले व्हेंटिलेटर्स बनवण्याचा परवाना पुणे,हैदराबाद व बंगळुरू येथील कंपन्यांना देण्यात आला आहे.

तर भारतातील ज्या कंपन्यांना हा परवाना मिळाला त्यात पुण्याची भारत फोर्ज लि., बेंगळुरूची अल्फा डिझाइन टेक्नॉलॉजीज प्रा. लि. व हैदराबादची मेधा सव्हरे ड्राइव्हज प्रा.लि यांचा समावेश आहे.

तसेच भारतीय कंपन्यांशिवाय इतर अठरा कंपन्यांना हे परवाने देण्यात आले असून त्यात आठ अमेरिकी व तीन ब्राझिलियन कंपन्यांचा समावेश आहे.

दी नॅशनल अ‍ॅरोनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (नासा) ही स्वतंत्र संस्था असून ती अवकाश संशोधनाला वाहिलेली आहे.

तर अमेरिकेतील रुग्णांसाठी दक्षिण कॅलिफोर्नियातील जेट प्रॉपल्शन प्रयोगशाळेत नासाने एक व्हेंटिलेटर तयार केला होता. तेथील अभियंत्यांनी तयार केलेल्या या व्हेंटिलेटरला ‘व्हायटल’ असे म्हटले आहे.

तर एक महिन्यात तो तयार करण्यात आला व त्याला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने 30 एप्रिल रोजी परवानगी दिली होती. व्हायटल म्हणजे ‘व्हेंटिलेटर इंटरव्हेन्शन टेक्नॉलॉजी अ‍ॅक्सेसिबल लोकली’नावाचे उपकरण असून त्याचे सुटे भाग पुरवठा साखळ्यात उपलब्ध आहेत.

गंभीर रुग्णांवर उपचारासाठी हा व्हेंटिलेटर वापरला जातो. त्याची रचना लवचीक असून त्यात सुधारणाही करता येतात.

BCCI कडून खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्माच्या नावाची शिफारस 


भारतीय क्रीडा क्षेत्रात मानाचं स्थान असलेल्या खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्माच्या नावाची शिफारस बीसीसीआयने केली आहे.

तर प्रत्येक वर्षी खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारांसाठी बीसीसीआय चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची नावं पाठवत असते.

2019 विश्वचषकात 5 शतकांसह केलेली धडाकेबाज कामगिरी आणि याचसोबत कसोटी क्रिकेटमध्ये केलेलं दमदार पुनरागमन यामुळे बीसीसीआयने खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्माच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.

तसेच याव्यतिरीक्त अर्जुन पुरस्कारासाठी शिखर धवन, इशांत शर्मा आणि महिला क्रिकेटपटू दिप्ती शर्मा यांची नावं बीसीसीआयने सुचवली आहे.

ला-लीगा फुटबॉल 11 जूनपासून 


स्पॅनिश फुटबॉल लीग म्हणजेच ला-लीगा तीन महिन्यांच्या कालावधीनंतर 11 जूनपासून सुरू होत आहे. 2020-21 मोसमाला 12 सप्टेंबरपासून सुरुवात होईल, असे स्पॅनिश क्रीडा परिषदेने स्पष्ट केले.

तर स्पेनमधील दोन स्पर्धाच्या उर्वरित 11 फेऱ्यांना सुरुवात करण्यावर स्पॅनिश फुटबॉल महासंघ आणि ला-लीगाचे एकमत झाले आहे. यंदाचा मोसम 19 जुलैला समाप्त होईल.

तसेच बेटिस विरुद्ध सेव्हिला यांच्यात होणाऱ्या सामन्याने करोनानंतरच्या मोसमाला 11 जूनपासून सुरुवात होईल.

नासाचे स्पेस एक्स लाँच 


अमेरिकी अंतराळ संस्था नासाने 9 वर्षांनंतर इतिहास रचला आहे.

तर फ्लोरिडाच्या केप कनवरल येथील जॉन एफ केनेडी स्पेस सेंटरमधून नासाने स्पेसएक्स डेमो-2 मिशन लाँच केले आहे. अमेरिकेने 9 वर्षांनी त्यांच्या जमिनीवरून अंतराळवीर पाठविले आहेत.

तसेच चंद्रावर उतरण्याचे पहिले उड्डाण याच केंद्रावरून करण्यात आले होते.

नासाचे संचालक जीम ब्राईडेन्स्टीन यांनी सांगितले की, अमेरिकेने 9 वर्षांनी त्यांच्या जमिनीवरून अंतराळवीर पाठविले आहेत.

नासाने यावेळी स्पेसएक्स फाल्कन 9 हे रॉकेट पाठविले आहे. यामध्ये रॉबर्ट बेंहकेन आणि डग्लस हुर्ले हे दोन अंतरालवीर आहेत.

तर हे यान पृथ्वीच्या कक्षेबाहेर यशस्वीरित्या गेले असून कॅप्सूल यशस्वीरित्या उघडल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले.

केरळचा के-फॉन प्रकल्प डिसेंबरपर्यंत राबविला जाणार आहे


30 मे 2020 रोजी केरळमध्ये झालेल्या घोषणा-फॉन (केरळ फायबर ऑप्टिक नेटवर्क) प्रकल्प अहवाल राजनैतिक दक्षिणेक प्रकल्प डिसेंबर 2020 साली पहाडी हिल आहे.

 शिल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये


 के-फॉन प्रोजेन्टेरियल केरळ सरकारचे उद्घाटन राज्यातील सर्व दिवस आणि अंमलबजावणी ऑप्टिकल फाइबर नेटवर्कशी जोडलेले आहेत.  हे सामर्थ्यपूर्ण राज्य 1548कोटी कोटी काँची ततूद आहे.  हा प्रकल्प राज्य आयटी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि राज्य सरकारच्या मालकीचा राज्य विद्युत मंडळामार्केट चेक समुद्र डोंगर आहे.

हा प्रकल्प सर्व कुटुंबे परवडणारी दैत्य निवारण, खाली निव्वळ येना निव्वळ पितृ नेट कनेक्टिव्हिटी उपस्थिति.

 फायदे

या प्रकल्पानुसार, 30,000 शासकीय अंमलबजावणीसाठी जागा आहेत.  किमान शास्त्रीय संस्था समाविष्ट आहे.  किंवा शोधलेला प्रकल्प ई-हेल्थ प्रोग्राम्सला चालना देणारा आहे.  या शिल्पाधिकारी आंदोलन, बंदरे, आयटी पार्क, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मर्ही होते.  आनंद इंटरनेट सेवेसाठी मोबाइल टॉवर्सना संयोजन प्रकल्प आहे.

Must Read (नक्की वाचा)
चालू घडामोडी 30 मे 2020

credit by:- स्त्रोत -PIB,The Hindu ,Times of India,Indian Express,BCC मराठी,लोकसत्ता,महाराष्ट्र टाइम्स

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post