21 may  2020 mpsc current affairs in marathi (Chalu Ghadamodi)
World Cultural Day 21 may

​नवी मुंबईला मिळाला ५ स्टार शहराचा दर्जा; स्वच्छ भारत मिशनमध्ये मानाचं स्थान


★ केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी कचरामुक्त शहरांच्या स्टार रेटिंगचे निकाल मंगळवारी जाहीर केले. यामध्ये महाराष्ट्रातील नवी मुंबई या एकमेव शहरानं कचरामुक्त शहरांच्या यादीत ५ स्टार रेटिंग पटकावलं आहे.

 ★ नवी मुंबई व्यतिरिक्त छत्तीसगढमधील अंबिकापूर, गुजरातमधील राजकोट आणि सूरत, कर्नाटकमधील म्हैसूर आणि मध्य प्रदेशातील इंदूर या शहरांनीही ५ स्टार रेटिंगचा मान पटकावला आहे.

★ केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी मंगळवारी याबाबत घोषणा केली. स्वच्छ भारत अभियानाद्वारे शहरांमध्ये स्टार-रेटिंग अंतर्गत विकसित केलेल्या स्वच्छता निर्देशकांच्या प्रकारांवर शहरांचे रेटिंग आधारित आहे.

★ यामध्ये कचरा संग्रहण, कचर्‍याचे स्त्रोत वेगळा करणे, कचर्‍यावर वैज्ञानिक प्रक्रिया करणे, भूगर्भशास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करणे, प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन, बांधकाम उपक्रमांचे व्यवस्थापन, डंप रेमेडिएशन आणि नागरिकांच्या तक्रारींच्या निवारण प्रणाली यांचा समावेश करण्यात आला आहे.

★ देशातील सर्व शहरे कचरामुक्त करणे हे या रेटिंगचे मुख्य उद्दीष्ट आहे. सर्व शहरांमध्ये घनकचरा, प्लॅस्टिक कचरा आणि बांधकाम उपक्रमांशी संबंधित कचऱ्याचं व्यवस्थापन शास्त्रोक्त पद्धतीनं कसं करता येईल याचीही खबरदारी घेण्यात आली आहे.

★ गेल्या वर्षी केवळ ३ शहरांना ५ स्टार रेटिंग देण्यात आले होते. परंतु या वर्षी ६ शहरांना ५ स्टार रेटिंग देण्यात आले आहेत.

ही आहेत ३ स्टार रेटिंग शहरं

1- नवी दिल्ली
2- तिरुपती
3- विजयवाडा
4- चंदीगड
5- भिलाई नगर
6- अहमदाबाद

'पीएम ई विद्या’: विद्यार्थ्यांना डिजीटल/ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी नवा उपक्रम


★ आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल करताना ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाच्या अंतर्गत वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी 17 मे 2020 रोजी प्रोत्साहन निधीच्या अंतिम भागातल्या घोषणा केल्या.

★ टाळेबंदीच्या काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होणार नाही, याची खातरजमा सरकारने केली आहे.

★ सर्व विद्यार्थ्यांना इंटरनेट उपलब्ध नाही, हे लक्षात घेत ‘स्वयम प्रभा’ DTH वाहिन्यांवरून शैक्षणिक कार्यक्रमांचे प्रसारण सुरू करण्यात आले आहे.

★ तंत्रज्ञानाधारित शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने ‘पीएम ई विद्या’ हा डिजीटल/ऑनलाईन शिक्षणासाठी उपयुक्त आणि विविध उपकरणांच्या माध्यमातून लाभ घेता येईल, असा कार्यक्रम तात्काळ सुरू केला जाणार आहे.

★‘पीएम ई विद्या’ अंतर्गत कम्युनिटी रेडियो आणि पॉडकास्टचा अधिकाधिक वापर केला जाणार आहे. दिव्यांग बालकांसाठी विशेष डिजीटल साहित्य उपलब्ध करून दिले जाणार.

★ 30 मे 2020 पर्यंत 100 अग्रणी विद्यापीठांना ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

देशांतर्गत विमानसेवा सोमवारपासून

★देशांतर्गत प्रवासी विमानसेवा सोमवार, 25 मेपासून टप्प्याटप्प्याने सुरू होईल, असे केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी बुधवारी जाहीर केले.

★ मात्र, आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानसेवा कधी सुरू होईल, याबाबतची अनिश्चितता कायम आहे.

★ विमानसेवा हिरव्या श्रेणीतील शहरांमध्ये सुरू केली जाण्याची शक्यता आहे. दिल्ली, मुंबई, बेंगळूरु, चेन्नई आदी महानगरांमध्ये ही सेवा सुरू करायची असेल तर राज्य सरकारांचे मतही विचारात घेतले जाऊ शकते.

★ तसेच करोनाकालीन परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रवाशांसाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे लागू केली जातील व त्यांची माहिती यथावकाश दिली जाईल, असे पुरी यांनी सांगितले.दिनविशेष : 21 मे 


World Cultural Day

1916: अमेरिकन कादंबरीकार हेरॉल्ड रॉबिन्स यांचा जन्म. (मृत्यू: 14 ऑक्टोबर 1997 )

1923 : स्विस गणितज्ञ अर्मांड बोरेल यांचा जन्म. (मृत्यू: 11 ऑगस्ट 2003)

1928 : कला समीक्षक व लेखक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचा

1881 : मध्ये वॉशिंग्टन (डी.सी.) येथे अमेरिकन रेड क्रॉस ची स्थापना झाली.

1904 :पॅरिसमध्ये फेड्रेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन (फिफा) ची स्थापना रोजी झाली.

★पंतप्रधान राजीव गांधी यांची श्रीपेरांबदुर येथे  21  मे  1991 रोजी आत्मघातकी पथकाने हत्या केली.

1994 :मध्ये 43व्या जागतिक सौंदर्य स्पर्धेत मिस इंडिया सुश्मिता सेनने मिस युनिव्हर्स हा किताब पटकावला. हा किताब मिळवणारी ती पहिलीच भारतीय आहे.

1 Comments

please do not enter any spam link in the comment box

Post a comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post